बुधवार, ८ ऑगस्ट, २०१२

Maruti Stotra


http://www.amazon.com/gp/product/1594773378/ref=as_li_tl?ie=UTF8&camp=1789&creative=390957&creativeASIN=1594773378&linkCode=as2&tag=httppshinde2h-20&linkId=QC2UMVMR2LSLV3Y5
HANUMAN
Maruti Stotra is a 17th century stotra, composed in Marathi Language. It is believed that written by Saint 'Samarth Ramdas' in 17th century. It is a compilation of praiseful verses that describe the many aspects and virtues of Maruti or Hanuman.

भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना   || १ ||
अर्थ :
हे हनुमंता, आपण भीमरूप , महारुद्र ,वज्र हनुमान , मारुती, वनाचे शत्रू, माता अंजनीचे पुत्र , प्रभू रामचंद्रांचे दूत आणि प्रभंजन आहात.

महाबळी प्राणदाता सकला उठवी बळे |
सौख्यकारी दुखहारी धूर्त वैष्णव गायका || २ ||
अर्थ:
हे हनुमंता , आपण महाबळी आणि प्राणदाता असून झोपलेल्यांना जबरदस्तीने उठवता .आपण लोकांना सुख देणारे असून लोकांच्या दुखाचे हान करणारे आहात .आपण धूर्त , विष्णुस्वरूप आणि उत्तम गाणारे आहात .

दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा |
पातालदेवातहान्ता भव्यासिंदूर लेपना || ३ ||
अर्थ :
हे हनुमंता , आपण दिनानाथ , हरिरूप , अतिशय सुंदर असून सर्व जगताच्या अंतर्यामी आहात. अहिरावण आणि महिरावण या पाताळातील देवतांना आपण ठार केलेत. आपल्या सर्वांगाला शेंदूर लावल्यावर आपण भव्य दिसता.

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथ पुरातना |
पुण्यवंता पुण्याशीला पावना परितोषका || ४ ||
अर्थ :
हे हनुमंता , आपण लोकनाथ आहात , जगन्नाथ आहात आणि प्राणनाथ हि आहात.आपण पुण्यवंत , पुण्यशील आणि पवित्र असून भक्तांना तृप्त करता .

ध्वजांगे उचली बाहो , आवेशे लोटला पुढे |
कालाग्नी कालारुद्रग्नी देखता कापती भये || ५ ||
अर्थ:
रामचंद्रांचा विजयी ध्वज आपल्या हातात धरून आपण मोठ्या आवेशात सर्व सैन्याच्या पुढे निघालात . आपले हे रौद्र रूप पाहून कालाग्नी आणि कालारुद्रग्नी देखील आपण मरणार या भीतीने थरकाप कपू लागतात.


Listen maruti stotra online here:


ब्रम्हांडे माईलि नेणो आवळे दंतपंगती |
नेत्राग्नी चालिल्या ज्वाला भृकुटी ताठील्या बळे || ६ ||
अर्थ :
हे हनुमंता , युद्धप्रसंगी रागाच्या भरात आपण जेव्हा दात-ओठ खाता तेव्हा सगळे ब्रम्हांड आपल्या मुखात मावेल असे वाटू लागते .क्रोधाने आपण आपल्या संतप्त नेत्रातून जणू तांबड्या ज्वाला बाहेर पडत असतात .

पुच्छ ते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी |
सुवर्ण काटीकासोटी घंटा किंकिणी नागरा || ७ ||
अर्थ:
आपण आपली शेपटी व्यवस्थित वळवून मस्तकाजवळ आणून ठेवली आहे . या शेपटीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मस्तकावरील मुकुट आणि कानातील कुंडले शोभून दिसतात . आपल्या कमरेला सोन्याची कौपिन झळकते आहे, तर चरणांमध्ये असलेल्या नुपुरांमधील घंटा चालताना किणकिण वाजत असतात.


ठकारे पर्वताऐसा नेटका सडपातळू |
चपलांग पाहता मोठे महाविदुलतेपरी ||८ ||
अर्थ:
हे हनुमंता , आपण मुळात सडपातळ असून आपले शरीरसौष्ठव प्रमाणबद्ध आहे . मात्र युद्धासमयी आपण जेव्हा विराट रूप धारण करतात तेव्हा एखादा पर्वतच समोर उभा ठाकला आहे असे वाटू लागते . एखाद्या विदुल्तेप्रमाणे आपले शरीर चपळ आहे .

कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे |
मंद्राद्रीसारखा द्रोणू क्रोधे उत्पतीला बाले ||९ ||
अर्थ :
आपल्या लीलाचारीत्रात आपल्या उड्डाणाचे असंख्य प्रसंग आहेत आणि नाना प्रकार आहेत . विशेषःत लक्ष्मण बेशुद्ध पडल्यावर आपण उत्तरेकडे झेपावालात तेव्हा रागाच्या भरात मंदाराचलासारखा द्रोणागिरी पर्वत आपण मुळासकट उपटून काढला तो प्रसंग मोठा विलक्षण म्हणावा लागेल .

आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती |
मनासि टाकिले मागे , गतीसी तुलना नसे || १० ||
अर्थ :
आपले आश्चर्य हे कि , आपण लंकेत आणलेला द्रोणागिरी पर्वत परत उत्तरेकडे जागेवर नेऊन ठेवला .दोन वेळा आपण उत्तरेचा प्रवास मनाच्या चपळाईने केला. वस्तुतः ज्यांनी आपली गती मनाला मागे टाकणारी आहे . त्यामुळे आपल्या गतीशी तुलना करता येईल अशी एकही वस्तू जगात नाही.

अणूपासोनी ब्रम्हांडा एवढा होत जातसे |
तयासी तुलना कोठे मेरुमांदार धाकुटे || ११ ||
अर्थ :
हे हनुमंत , आपण अणूपासून ब्रम्हान्डाएवढे मोठे होत जाता . आपल्या या विशाल रुपाला तुलनाच नाही .विशालातेबद्दल प्रसिद्ध असलेले मेरू आणि मंदार हे पर्वत आपल्यापुढे चिमुकले वाटू लागतात .

ब्रम्हान्डाभोवते वेढे वज्रपुच्छे करू शके |
तयासी तुलना कैंची ब्रम्हांडी पाहता नसे || १२ ||
अर्थ :
हे हनुमंत , आपण वज्रपुच्छे एवढे लांब होऊ शकते कि , त्या द्वारे अवघ्या ब्रम्हांडाला गुंडाळता येईल. अशा परिस्थितीत संपूर्ण ब्रम्हांडात असा एकही पदार्थ शोधून सापडणार नाही , कि ज्याच्याशी आपल्या वाज्रपुच्छाची तुलना करता येईल.

आरक्त देखिले डोळा ग्रासिले सुर्यामंडला |
वाढता वाढता वाढे भेदिले शुण्यमंडला || १३ ||
अर्थ :
हे भगवंता , आपणास पाळण्यात ठेवून अंजनिमाता बाहेर गेली असता आपण आरक्तवर्ण सूर्यबिंब पाहिले. फळ समजून आपण ते गिळले . सूर्यबिंब गिळण्यासाठी आपल्याला खूप मोठे व्हावे लागते . मोठे होत असताना आपण वाढत वाढत सूर्यमंडळ ग्रासून टाकले.

धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही |
पावती रुपविद्यादी स्तोत्रपाठेकारुनिया || १४ ||
टीप:हा श्लोक मूळ मारुती स्तोत्र मध्ये नाही.


भूतप्रेतसमंधादि रोगव्याधी समस्तही |
नासतीतुटती चिंता आनंदे भीमदर्शने ||१४ ||
अर्थ :
हे हनुमंता, आपल्या भव्य दर्शनाचा लाभ असा विलक्षण आहे कि त्या द्वारे सर्व शारीरिक आणि मानसिक आजर सर्व प्रकारची काळजी एवढेच नव्हे तर भूत , प्रेत, समंध यांच्याद्वारे होणारा त्रास कायमचा नाहीसा होऊन भक्ताला आनंदाची प्राप्ती होते.

हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी |
दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकलागुणे || १५ ||
अर्थ :
हे हनुमंता, हे पंधरा श्लोक म्हणजे चंद्राच्या प्रतिपदा ते पौर्णिमा अशा पंधरा कला आहेत .पंधरा श्लोकांद्वारे आपण केलेले हे स्तवन आम्हाला चांगले लाभदायी ठरले.त्यामुळे आमचे शरीर सुदृढ झाले आणि मन निशंक झाले.
.
रामदासी अग्रगण्यू कापिकुळासी मंडणू |
रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नसती || १६ ||
अर्थ :
हे हनुमंता, समस्त रामभक्तांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात .आपल्यामुळे वानराकुळाला प्रतिष्ठा मिळाली . आपण रामस्वरूप असून सर्वांच्या अंतर्यामी आहात . आपल्या दर्शनाने समस्त दोषांचा परिहार होतो.

इति श्री रामदासकृतम् संकटनिरसनम् नाम मारुतीस्तोत्रम् संपूर्णम् ||
अर्थ :
अशाप्रकारे समर्थ रामदासांनी रचलेले आणि संकटांचे निरसन करणारे हे मारुतिस्तोत्र येथे संपूर्ण झाले .

Quote Of the Day

You Are Not A Human On A Spiritual Journey.
You Are A Spirit On A Human Journey.
Pierre Teilhard de Chardin